बोगस गिधाड

____बोगस गिधाडं"____

बोगस गिधाडं बसलेत टपून
प्रत्येक पाऊल टाका जपून
वेळीच आवर घाला यांना
वेळीच त्यांचे पंख छाटून

हाळूच बाहेर येत आहेत
चोच मारून बघत आहेत
मेलेल्या जनावरांसारखे
लचके आपले तोडत आहेत

दाखवावा लागेल त्यांना आता
आपल्यामधला जिवंतपणा
नाहीतर आपण मेलोय समजून
दाखवतील त्यांचा खोटेपणा

वेळीच यांना हाकला नाहीतर
पुन्हा पुन्हा जवळ येतील
आपल्या ताटातील अर्धी भाकर
चोरासारखे पळवून नेतील

आजपर्यंत झोपलो होतो
आता जागी राहिलं पाहिजे
बोगसगीरीच्या या गिधाडांपासून
समाज आपला वाचवला पाहिजे

           सिताराम कांबळे

Comments