______एकीचे बळ____
बोगसांचा भरलाय बाजार
समस्या पण वाढल्यात फार
राजरोसपणे लुटू लागलेत
आपलेच सर्व अधिकार
भांडण तंटे सोडा आता
एकमेकांना साथ द्या
एक होऊ आपण सर्व
एकीचा हात हातात घ्या
एकजुटीने लढू आपण
कोणतेही येउद्या संकट
एकजुटीचा वार करून
उखडून टाकू मुळासकट
फक्त एकी तोडू नका
एकजुटीने अखंड रहा
एकजुटीचा बसेल दणका
शत्रूला तेव्हा पहात रहा
एकीचे बळ दाखवू जगाला
लढायला फक्त तयार रहा
एकीचे बळ मिळेल फळ
आपण फक्त पहात रहा
आम्ही आहोत आदिवासी
या देशाचे मूळ रहिवासी
हटणार नाही मागे कधी
लढत राहू प्राणांनीशी
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले
Comments
Post a Comment