मी लढणार

___मी लढणार___

कोरोनाविरुद्ध लढाई
आज मी लढत आहे
माहीत नाही मला पण
विजय किती लांब आहे

हरणार नाही लढाईत या
विजय माझा नक्की आहे
नाही हातात शस्त्र पण
इच्छाशक्ती मोठी आहे

तीच शक्ती तीच भक्ती
कोरोनाला हरवू शकते
विश्वास पाहिजे तिच्यावर
तीच शेवटी तारू शकते

नका घाबरू नका बावरू
धीर कधी सोडू नका
विजय आपलाच आहे
हे आपण विसरू नका

एक जाईल,दुसरं येईल
संकट ही चालूच राहणार
आयुष्याच्या या रणभूमीवर
शेवटपर्यंत लढत राहणार

आपल्यात पण आहे शक्ती
तिला आधी जागृत करा
येउद्या कोणतंही संकट समोर
धीराने त्याचा सामना करा

        सिताराम कांबळे
    मुलुंड वेस्ट,पोष्ट ऑफिस

Comments