दहशतवाद

______दहशतवाद_____

बंडकऱ्यांचा तालुका म्हणून
अकोल्याची ओळख आहे
अन्याय,अत्याचार गाडनाऱ्या
क्रांती वीरांचा इतिहास आहे

आज पुन्हा याच भूमीत
अत्याचार वाढत आहेत
आदिवासी समाज पुन्हा
त्यांची शिकार होत आहेत

न्याय मागणाऱ्यांचा आवाज
दहशतीने दाबला जात आहे
गुंड प्रवृत्तीचा वाढता प्रभाव
समाजासाठी धोक्याचा आहे

समाज संघटीत नाही याचा
गावगुंड फायदा घेत आहेत
समाजाला कमजोर समजून
मुस्कटदाबी करत आहेत

आदिवासी समाज आपला
हा कधीच नव्हता कमजोर
सर्व समाजाने एकत्र येऊन
दाखवू आता एकीचा जोर

कोणीही असो नेता किंवा गुंड
मनमानी त्याची चालणार नाही
आदिवासी समाज आपला
शांत आता बसणार नाही

वेळ आली तर आता पून्हा
बंडाची मशाल पेटवू आम्ही
तालुक्यातील गुंडगीरीची
दहशत जाळून काढू आम्हीं

हीच वेळ आहे आता
दहशत मोडून काढण्याची
आदिवासींवर होणाऱ्या
अन्यायाविरुद्ध काढण्याची

आपल्या न्याय हक्कांसाठी
आपण आता लढलच पाहिजे
तालुक्यातील दहशद वादाला
कायमस्वरूपी गाडलंच पाहिजे

         सिताराम कांबळे
  गारवाडी,ता.अकोले,अ.नगर

Comments