___कटू सत्य___
बाप राबतो शेतात
पोरं हिंडती गावात
नाही धरला त्यांनी
कधी कासरा हातात
उभ्या आयुष्यात नाही
तुटकी वहान भेटली
काम करता करता
जुनी बंडीही फाटली
त्याची पोरं लाडकी
गाडी घेऊन फिरती
वरून पेट्रोलचा खर्च
आई बापाकं मागती
बाप म्हणे माझी पोरं
त्यांचा मलाच आधार
त्यांना शाळा शिकवून
करील वकील,डॉक्टर
पोरं शिकेनात शाळा
शिकू लागल्या पोरीसोरी
चांगल्या शिकून सवरून
झाल्या मोठ्या अधिकारी
म्हणे वंशाचा दिवा
आजूबाजूला अंधार
लेक लावी खूप जीव
तिचा सांभाळून संसार
सिताराम कांबळे
गारवाडी अकोले
Comments
Post a Comment