_____जन्मभूमी_____
गाव सोडुन शहरात गेला
मोठा रुबाब त्याला आला
नातेवाईक दिसेना त्याला
गेला विसरून समाजाला
काय चाललंय गावात
याची नसते त्याला जान
गावच्या समाज कार्यात
नसतं काहीच योगदान
सरकारी नोकरी मीळाली
बांगला गाडी दारात आली
नशा पैशाची चढू लागली
माणुसकी कोसो दूर गेली
नाही माणसात कधी येत
फक्त मोठं त्याचं नाव
माया नगरीत जाऊन
गेला विसरून जन्मगाव
जन्मभूमी आपली थोर
कधी विसरू नका तिला
कधीतरी काढून वेळ
भेट द्या आपल्या गावाला
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment