___लेकीचं लग्न___
बापाचं कर्ज
आलं मागणं लेकीला
झाला आनंद बापाला
माणसं वाटली चांगली
होकार दिला लग्नाला
मान पान सत्काराचा
हाच खर्च आहे मोठा
कुठून करावा हा खर्च
हाच प्रश्न पडला मोठा
कर्ज बॅंकेचं काढून
आला खरेदी करून
तरी पैसे पडले कमी
ठेवली जमीन गहाण
लेक रहावी सुखात
हीच भावना मनात
लाडक्या लेकीसाठी
बाप बुडाला कर्जात
नको खर्च वारेमाप
फक्त मोठेपणा साठी
तोच पैसा वापरावा
तिच्या भविष्यासाठी
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment