गाव पुढारी

____गाव पुढारी____

विचित्र आहे गाव आपलं
विचित्र आहेत माणसं
कसा होईल गावाचा विकास
कोणालाच नाही समजत कसं

नको रस्ते,नको गाड्या
चालतो आम्ही कोसो दूर
मनासारखं नाही झालं तर
बडवत बसतो स्वताच उर

श्रेयवादाचं राजकारण
त्यात होतंय गावच मरण
आपल्या चुका झाकण्यासाठी
दुसऱ्याचं करतोय वस्त्रहरण

मी मोठा की तू मोठा
यातच आपलं आयुष्य गेलं
कित्येक पिढ्या निघून गेल्या
पण काहीच नाही करता आलं

स्वयंघोषीत गाव पुढारी
आहेत फक्त नावाला
काहीच नाही यांचा फायदा
मागासलेल्या या गावाला

मूलभूत सोयी सुविधा यांचा
सर्वानाच पडलाय विसर
उनी धुनी काढण्यात मात्र
सोडत नाहीत कसली कसर

सुशिक्षित माणसही आपली
आडण्यासारखी वागू लागली
एकमेकांचे पाय ओढण्याची
जणू काही शर्यद लागली

बदला आपली विचारसरणी
तरच काहीतरी बदल होईल
नाहीतर सारं जग पुढे जाईल 
आपला गाव जागेवर राहील

      सिताराम कांबळे

Comments