______राजकारण_____
काय राव जमाना आलाय
लोकशाहीचा बट्ट्याबोळ झालाय
राजकारणाच्या खेळामध्ये
रक्षकच भक्षक झालाय
कोण खरं कोण खोटं
सर्व काही अज्ञात आहे
राजकारणाच्या जाळामध्ये
सामान्य जनता जळत आहे
आरोप प्रत्यारोपाचे बॉम्ब
रोज येथे फुटत आहेत
सामान्य जनता मात्र
हक्कांसाठी लढत आहे
पुढाऱ्यांचं राजकारण
त्यात होतंय जनतेचं मरण
आपल्या चुका झाकण्यासाठी
दुसऱ्यांचं करतात वस्त्रहरण
एकमेकांच्या बदनामीचा
रोजच खेळ चालू आहे
सामान्य जनता मात्र
उपासमारीने मरत आहे
राजकारणातून वेळ नाही
जनतेचे प्रश्न सोडवायला
पण तयार असतात मंत्री,संत्री
घोटाळेबाजांना सोडवायला
लाज लज्जा तर सोडून दिलेय
हल्लीच्या राजकारण्यांनी
जनता मात्र त्रस्त झालेय
यांच्या आपसातील भांडणांनी
पुढारी झाले करोडपती
जनतेची झालेय अधोगती
तरीही म्हणतात पुन्हा येऊ
जनतेचं कल्याण करण्यासाठी
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले अ.नगर
Comments
Post a Comment