____स्वार्थी दुनिया____
माणसाचं कसं असतं ना
गरज आसली की
गोड गोड बोलणार
गोल गोल फिरणार
गरज संपली की
दूर दूर लोटणार
गरज असली की
स्वताहून भेटणार
तुझ्यासारखं कोणीच नाही
असं वर वर दाखवणार
हारबऱ्याच्या झाडावर चढवणार
गरज संपली की
तिथूनच खाली ढकलणार
दुनियाच सारी बदलून गेलेय
सारी दुनियाच स्वार्थी झालेय
माणुसकी तर हरवून गेलेय
प्रेम हा शब्द पण आता
खोटा वाटायला लागलाय
फक्त स्वार्थासाठी त्याचा
उपयोग होऊ लागलाय
विश्वास कोणावर ठेवायचा की नाही
हाच आता प्रश्न पडतोय
कारण स्वार्थासाठी कुणाचाही
रोजच विश्वासघात होतोय
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
Comments
Post a Comment