धमाल प्रेम गीत - कशाला मनात झुरतीस गं

कशाला मनात झुरतीस गं.........

कशाला मनात झुरती ग
दुरून इशारा करती ग
मनातलं माझ्या कसं सांगू मी तुला
ये ना राणी जवळ ये ना ग मीठीमध्ये घेतो मी तुला

तुझी माझी नजरेला नजर मिळाली
पाहून तुला जीव माझा होतो वर खाली
तू दूर नको राहू ग,दुरून नको पाहू ग
एकदा तरी जवळ येऊन बस ना बाजूला
ये ना राणी जवळ ये ना ग मिठीमध्ये घेतो मी तुला

प्रेम किती करतो मी,नाही तुला ठाव
काळजावर कोरलं मी,तुझंचं ग नाव
तुझ्याच मागं फीरतो मी,तुझ्यावरच मरतो मी
मनातलं प्रेम कसं समजना तुला
ये ना राणी जवळ ये ना ग मिठीमध्ये घेतो मी तुला

खाऊ नको भाव नको करू वेड्यावाणी
दोघे मिळून लिहू आपल्या प्रेमाची कहाणी
आगं तूच माझी पिल्लू ग,नको बनवू मला उल्लू ग
तुझ्यासाठी जीव माझा झाला ग खुळा
ये ना राणी जवळ ये ना ग,मिठीमध्ये घेतो मी तुला

Comments