राख रांगोळी

कोंभाळणे ता.अकोले,जि.अ.नगर
        येथील घटना

____राख रांगोळी___

घटना खूप वाईट झाली
रहातं घर आमचं पेटलं
घराची आग वीझवताना
पाणी डोळ्यातच आतलं

होळी झाली संसाराची
राख शिल्लक राहिली
जळत होती जनावरं
नाही कोणी पाहिली

मन जाळालं,धन जळालं
सारं काही जळून गेलं
बघत रहाणं राखेकडे
हेच फक्त नशीबी आलं

काय होती चूक आमची
इतकी मोठी शिक्षा झाली
चीलीपीली पाळण्यामधली
उघड्यावरच झोपू लागली

आयुष्याची पुंजी आमची
एका क्षणात नष्ट झाली
कसं जगावं आयुष्य पुढचं
हीच आता काळजी लागली

वाटू लागलंय मनाला आता
सर्व काही सोडलं पाहिजे
नवी उमेद घेऊन आता
पूर्वीसारखं जगलं पाहिजे

आम्हाला साथ द्या
मदतीचा हात द्या
आलेल्या या संकटातून
तुम्हीच आता तारून न्या

     सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments