खेळ राजकारणाचा

___खेळ राजकारणाचा___

राजकारणाच्या खेळामध्ये
डाव चांगलेच रंगले आहेत
सर्वच राजकीय नेते मंडळी
खेळात त्यांच्या दंग आहेत

एकमेकांचे कपडे फाडण्यात
प्रत्येक जण व्यस्त आहे
यांच्या अशा वागण्यामुळे
जनता मात्र त्रस्त आहे

दाखवायला फक्त समाजसेवा
बाकी सगळं राजकारण आहे
नेत्यांच्या या नीच राजकारणात
सामान्य जनता मात्र मरत आहे

दररोज यांचे आरोप प्रत्यारोप
यातच यांचे दिवस चाललेत
वेळ नाही यांना जनतेसाठी
भांडण्यामध्ये व्यस्त आहेत

प्रत्येक गोष्टीत राजकारण
हाच यांचा उद्योग झालाय
सामान्य माणूस यांच्यामध्ये
विनाकारण भरडला गेलाय

मंत्री,संत्री दिवसा ढवळ्या
जनू दरोडेच टाकू लागलेत
भिकाऱ्यांपेक्षाही भिकारी
राजकारणी हे नेते झालेत

भ्रष्टाचार करा,मालमत्ता जमवा
पण निदान खून तरी करू नका
तुमच्या राजकीय स्वार्थासाठी
सामान्य जनतेला मारू नका

      सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments