राजकारणी

______राजकारणी______

राजकारण मात्र चाललय मस्त
माणसाचा जीव झालाय स्वस्त
शेतकरी,कामगार करतात कष्ट
कोरोना दररोज घालतोय गस्त

कोणाचाच कोणाशी नाही मेळ
जनतेच्या जीवाशी चाललाय खेळ
कोरोनाच्या जागतिक संकटात पण
नेत्यांचे चाललेत राजकीय खेळ

जनतेचा कोणी करीना विचार
नेत्यांचा आडवा येतोय अहंकार
कोरोनाचंही भांडवल करून
भरवू लागलेत आपलाच दरबार

कोरोनाचं संकट दिसतंय समोर
राजकारणी खूपच झालेत मुजोर
सत्तेच्या हव्यासापायी हे पुढारी
महाराष्ट्राला करू लागलेत कमजोर

प्रत्येक गोष्टीत यांचं राजकारण
यातच जनतेचं होतंय मरण
कसं जाणार कोरोनाने संकट
आवघड झालंय जनतेचं जीवन

पुढाऱ्यांनो अतिरेक करू नका
जनतेच्या जीवाशी खेळू नका
जनता तुम्हाला जागा दाखवील
तेव्हा मात्र गळा काढून रडू नका

          सिताराम कांबळे
    गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments