____पाऊस आला____
पाऊस आला पाऊस आला
अंगणात तलाव तयार झाला
पावसाचा आनंद लुटायला
तलावात जाऊ पोहायला
कागदाच्या करू होड्या
चिखलामध्ये मारू उड्या
चिखलामध्ये नाचू गाऊ
पहिल्या पावसाचा आनंद घेऊ
सरीवर पडतात सरी
नाही थांबायचं आता घरी
पावसात भिजून चिंब होऊ
आनंदाने नाचू गाऊ
सोसाट्याचा सुटलाय वारा
चिमणी पाखरं शोधतात निवारा
जोरात पडतात पाऊस धारा
गारांचाही पडलाय पसारा
नाचून गाऊन थकल्यावर
गपचूप गाठू आपले घर
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
Comments
Post a Comment