____कोरोना लस___
आली कोरोनाची साथ
लोक झाली भयभीत
घ्यावी टोचून ही लस
यात आपलंच हित
लस मीळना शहरात
पैसे देऊन रोकडे
कोणी घेईना फुकट
लस खेडे गावाकडे
मरणाची भीती खूप
ती जाईना मनातून
लस टोचावी की नाही
पडला प्रश्न गहन
जनजागृती करून
करा लोकांना तयार
कोरोनाशी लढायला
आहे लस हे हत्त्यार
तरुणांनी यावं पुढे
जनजागृती करावी
कोरोनाची महामारी
लस टोचून मारावी
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment