मदतीचा हात

____मदतीचा हात____

कोरोनाने केलं हैराण
जळू लागलं माणसांचं रान
प्राणवायूही पडतोय कमी
कसे वाचणार माणसांचे प्राण

कोरोनाचा वाढलाय धोका
विनाकारण फिरू नका
जपा आपल्या जीवाला
जीव धोक्यात घालू नका

पहिला होता फक्त शहरात
आता पोहचला गावा गावात
आजारापेक्षा भीतीच जास्त
भरू लागली आपल्या मनात

गरज आहे जनजागृतीची
आपल्या भरीव मदतीची
वाट बघातात आपले बांधव
आपल्या आर्थिक सहकार्याची

गरीब आहे आपला समाज
वास्तव्य आपलं दऱ्याखोऱ्यात
नाही मिळत काहीच सुवीधा
दिला पाहिजे मदतीचा हात

समाज आज झालाय बेजार
सर्व मिळून करा विचार
आपला समाज वाचवण्यासाठी
दिला पाहिजे भक्कम आधार

कोरोनाची ही महामारी
पोहचू लागली घरोघरी
संकटकाळी मदत करणे
सर्वांचीच आहे जबाबदारी

मिळून सर्व नोकरदार
समाजाला देऊ आधार
मायभूमीच्या मातीचे
चला फेडू उपकार

      सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
      8652759928

Comments