आई VS मम्मी

___आई vs मम्मी___

आईच्या मायेची सर
नाही मम्मीला येणार
नाही तान्हुल्याला कधी
पदराखाली ती घेणार

माझ्या आईचा पदर
आहे मायेची चादर
तिची ऊब लागताच
झोपी जातात लेकरं

बाळ पाठीशी बांधून
आई राबते शेतात
बाळ गाडीत ठेऊन
मम्मी चालती लोटीत

आई पदराच्या आडून
दूध पाजीते बाळाला
स्थनपानाचा महिमा
नाही मम्मीला कळाला

आई असून आडाणी
मला घेऊन फिरती
मम्मी आहे शिकलेली
पाळणाघरात सोडती

     सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments