ती आणि तो - बळीराजा

 ती-लवकर उठून शेतात जाता

     उपाशी पोटी औत हाकता

     आहो कारभारी या लवकर जेवायला

     कांदा भाकर मी आणली खायाला


तो-थांब थोडा वेळ येतो मी जेवायला

     आधी बैलांना नेतो पाणी पाजायला


तो-बैल सावलीत बांधतो

     त्यांना वैरण घालतो

     त्यांच्याच जीवावरती

     आपण शेती ही करतो

     वाढ लवकर येतो मी जेवायला

     परत जाईल मी औत धरायला


ती-आहो कारभारी या लवकर जेवायला

     चटणी भाकर मी आणली खायाला


ती-तुम्ही रोजच असंच म्हणता

     काम करून उपाशी मरता

     आपल्या शेतात राबून

     पोट दुनियेच भरता

     घाम रोजच लागतोय गळायला

     आहो कारभारी आता या ना जेवायला


तो-वाढ लवकर येतो मी जेवायला

     परत जाईल मी औत धरायला


ती-आता उशीर नका लावू

     या लवकर जेवून घेऊ

     काम लवकर उरकून

     आज संगतीच घरी जाऊ

     दिवस लागलाय आता ढळायला

     आहो कारभारी आता या ना जेवायला


तो-गाय बैल आपलं धन

    आपण ठेऊ या जपुन

    कमी असली आपली शेती

    तरी करू या आनंदानं

    नेतो बैल रोज रानात चारायला

    वाढ लवकर येतो मी जेवायला


ती-आहो कारभार या लवकर जेवायला

     कांदा भाकर मी आणली खायाला

Comments