_____मी शेतकरी____
लवकर उठून शेतात जातो
उपाशी पोटी औत हाकतो
तेव्हा कुठे शेत पिकवतो
धान्याची रास घरी लावतो
उन्हात शेतात करतो काम
अंगात मुरतो कष्टाचा घाम
कामात नसतं कसलं भान
करत नाही कधीच आराम
मी शेतकरी मी कष्टकरी
खातो मी कष्टाची भाकरी
काळी आई माय माऊली
करतो मी तीचीच चाकरी
बैलजोडी माझी खिल्लारी
शोभून दिसते जोडी भारी
त्यांच्यामुळेच पिकते शेती
तीच आमची दौलत खरी
काळी आई आमची माता
तीच आमची भाग्यविधाता
तिच्यावरच जीवन आमचे
म्हणून नाही कसली चिंता
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
Comments
Post a Comment