_______प्रेमाचा पाऊस____
तुझ्या डोळ्यांची वीज चमकली
माझ्या काळजात येऊन धडकली
प्रेमाची ही गंगा जाऊन समुद्राला मिळू दे
तुझ्या प्रेमाचा पाऊस पडू दे
त्यात मनाला माझं भिजू दे
पडू लागल्या पाऊस धारा
गार गार हा सुटलाय वारा
सांग कुठं मी शोधू निवारा
तुझ्या कुशीत दे ना आसरा
घाबरला हा जीव बिचारा मायेची ऊब मिळु दे
तुझ्या प्रेमाचा पाऊस पडू दे
त्यात मनाला माझ्या भिजू दे
मनाला माझ्या वेड लागलं
चौफेर तुलाच शोधू लागलं
तुझ्या भेटीला आतुर झालं
दिवसाही स्वप्न पाहू लागलं
कशी घालावी समजूत त्याची मला एकदा कळू दे
तुझ्या प्रेमाचा पाऊस पडू दे
त्यात मनाला माझ्या भिजू दे
तुझ्या भेटीची ओढ लागली
आजून होईना भेट ही पहिली
रोज देवाला फुले वाहिली
तरी आजून तू नाही पावली
माझ्या मनाचं फुलपाखरू बागेत तुझ्याच खेळू दे
तुझ्या प्रेमाचा पाऊस पडू दे
त्यात मनाला माझ्या भिजू दे
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले, अ.नगर
Comments
Post a Comment