घातकी पाऊस

 ___घातकी पाऊस__


मुंबईची तुंबई झाली

रस्ते गेले पाण्याखाली

जलपरी होऊन रेल्वे

पाण्यावर पोहू लागली


समुद्र मात्र खुश झाला

मुंबईच्या भेटीला आला

मुंबईची अवस्था पाहून

पुन्हा माघारी निघून गेला


कुठे कोसळल्या दरडी

तर कुठे पडल्या भिंती

रस्त्यावर चालतानाही

पाण्याची वाढली भीती


वाटलं नव्हतं कधी

निसर्ग इतका कोपेल

झोपेमधला माणूस

कायमचाच झोपेल


पावसाची ही क्रूर खेळी

कित्येकांचे गेले बळी

मुसळधार पावसातही

प्रेतांची जळाली होळी


रुळावरती साठलं पाणी

बंद झाली जीवन वाहिनी

प्रवाशांचे तर झाले हाल

रस्त्यांवरच्या प्राण्यांवाणी


      सिताराम कांबळे

गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments