महापूर

 ____महापूर___


वरुण राजा कृपा कर

आता तरी थोडा थांब

घर दार सोडून आमचं

पळावं लागतंय लांब


घरं गेली पाण्याखाली

होत्याचं नव्हतं झालं

काय करावं तेच कळेना

जगणं पण मुश्कील झालं


कितीतरी जिवाभावाची

माणसं तू घेऊन गेलास

खरं सांग वरुण राजा

तू इतका का कोपलास


मुकी जनावरं आमची

डोळ्यासमोर वाहून गेली

काहीच नाही करता आलं

फक्त बघायची वेळ आली


सर्वांचीच अडचण झाली

मदत तरी कोण करणार

सर्व काही तुझ्याच हाती

तूच आमचा तारणहार


जगवायचं की मारायचं

तूच आता विचार कर

जगणं मरणं तुझ्याच हाती

थांबायची तरी कृपा कर


     सिताराम कांबळे

गारवाडी, अकोले,अ.नगर

Comments