____रक्षाबंधन___
रक्षा बंधनाचा हा सण
साजरा करू आनंदात
भावबहिणीच्या प्रेमाचं
आहे आतुट हे नातं
रक्षाबंधन जवळ आलं
ओढ भेटीची लागली
आईसारखी प्रेमळ माया
ताई मी तुझ्यात पाहिली
वाट पाहतो भाऊ तुझा
ये गं लवकर गावाला
नेहमी सुखी ठेव ताईला
रोज विनवतो देवाला
मारायची तू बालपणी
खेळताना चिडल्यावर
तूच देत होती आधार
चालताना पडल्यावर
राग नाही धरला माझा
कधीच चुकून मनात
भाऊ बहिणीचं हे नातं
आहे महान या जगात
तुझ्यासारखी बहीण
नाही दुसरी या जगात
ताई येईल माहेराला
राखी बांधायला हातात
सिताराम कंबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
Comments
Post a Comment