एकदा मागे वळून तरी पहा

 आपल्या समाजातील बरेच लोक शिकलेत पण चांगले अधिकारी,व्यावसायिक पण झालेत पण समाजाकडे मागे वळून बघायला त्यांच्याकडे वेळ नाही अशा बांधवांसाठी


पुढे निघून गेलास दादा

एकदा मागे वळून बघ

दिसतील तुला सर्वत्र

गरिबीचे काळे ढग


बेकारीच्या खोल डोहात

आपलेच मित्र बुडत आहेत

कामधंदा शोधण्यासाठी

वणवण ते फिरत आहेत


शिकलेत बरेच तुझ्यासारखे

पण कामधंदा नाही हातात

विलाज नाही काही म्हणून

राबत आहेत उन्हातान्हात


मोलमजुरूरी करून तरी

किती दिवस असे काढणार

की आयुष्यभर असेच ते

दुसऱ्याच्या शेतात राबणार


नको देऊ पैसा अडका

फक्त एकच मेहरबानी कर

सुखी जीवन जगता येईल

आसं फक्त मार्गदर्शन कर


      सिताराम कांबळे

गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments