सोनं

 _____सोनं_____


पडू लागला पाऊस

बळीराजा खुश झाला

बैल जोडीला घेऊन

शेताकडे तो निघाला


चालू केली नांगरणी

धरुन नांगर हातात

मग करून चिखल

भात लावलं शेतात


शेत नींदुन काढलं

पीक वाढलं जोमानं

आज भाताच्या रूपानं

सोनं दिलंय देवानं


आलं पीक कापायला

दिसू लागलं ते सोनं

पाहून त्या पिकाकडे

मन झालं हो प्रसन्न


धार लावून विळ्याला

चालू केली येटाळणी

भारा बांधून भाताचा

गेला खळ्यात घेउनी


पात बैलांची धरून

भात घेतलं मळून

गोण्या भरून सोन्याच्या

गेला घराला घेऊन


     सिताराम कांबळे

गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments