जखमी मन

 ____जखमी मन___


बदलतं रूप पाहून तुझं

मन आज माझं भेदरलं

भूकंपाची लागली चाहूल

आतल्या आत हादरलं


मन माझे तयार नव्हते

तुला सोडून जायला

नयन माझे तरसत होते

तुला रोज पाहायला


कशीतरी समजूत घालून

तुझ्यापासून दूर केलं

गुंतलेल्या या मनाला

थोडं आता मुक्त केलं


दिसू लागली मला आता

प्रेमाची ही आवघड वाट

समजून नाही घेतलं तर

नाजूक मनाचा होतो घात


प्रेम करणं सोपं असतं

टिकवणं खुपच आवघड

नको करायला इथे कोणी

फक्त भावनिक चढाओढ


जगेल मी कसा पण

तुला हृदयात बंद करून

येईल तुझी आठवण तेव्हा

फीरवील हात हृदयावरून


      सिताराम कांबळे

गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments