वाघोबा

 ______वाघोबा______

वाघाबार्शीच्या सणाला

जाऊ वाघोबा पूजायला

खीर,कोंबड्याचा नैवेद्य चला देऊ या वाघोबाला

लव्हाळी गावाच्या शिवाला

आमचा वाघोबा बसला

पुजू भक्तिभावाने त्याला

तो पावेल हो नवसाला

देऊ नको रे त्रास,आमच्या गाया वासराला

खीर,कोंबड्याचा नैवेद्य,चला देऊ या वाघोबाला

टोलार खिंडीच्या समोर

उंच हरीचंद्र डोंगर

राज्य करतो हा वनराजा

घनदाट या जंगलावर

नाही कुणाची भीती,या जंगलच्या राजाला

खीर,कोंबड्याचा नैवेद्य,चला देऊ या वाघोबाला

राजा हरीचंद्र प्रतिष्ठान

आंबित गावाचे धरण

आजूबाजूचा परिसर

सर्वच वाघोबाचे रान

फिरून सर्व रान,येतो पाचनई गावाला

खीर,कोंबड्याचा नैवेद्य,चला देऊ या वाघोबाला

आमचं वाघोबा दैवत

आहे पाचनई गावात

वाघबार्शीचा सण

साजरा करतो आनंदात

मिळून लहान थोर,आम्ही पूजतो या देवाला

खीर,कोंबड्याचा नैवेद्य,चला देऊ या वाघोबाला

       सिताराम कांबळे

गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments