हेच का प्रेम

 ___हेच का प्रेम___


खूप आनंद झालं होता

प्रेमात तुझ्या पडताना

खूप त्रास होतोय आता

त्यातून बाहेर पडताना


तुझ्या संगतीचे दोन क्षण

स्वर्गात जणू घालवले

दूर जाताना तुझ्यापासून

डोळे आज पान्हवले


वाटलं नव्हतं मला कधी

आसही एक वादळ येईल

भावना माझ्या मनातील

अचानक घेऊन जाईल


कुठं चुकलं माझं काही

माझं मलाच कळलं नाही

रोज शोधतोय उत्तर पण

उत्तर काही मिळत नाही


चूक असो कुणाचीही

मनं मात्र वेगळी झाली

नाही समजलं मला पण

वेळ ही अशी का आली


बोलणं चालणं सर्व काही

अचानक कसं बंद झालं

आहे का माहीत तुला तरी

प्रेम असं का पलटी झालं


प्रेम होतं की स्वप्न होतं

याचाच मी विचार करतोय

पण खरं सांगतो तुला आज

तुझ्यापासून मी दूर जातोय


होईल त्रास मला पण खूप

तुझ्याशिवाय जगताना

तरीही होईल आनंद मला

तुला रोज सुखी बघताना


       सिताराम कांबळे

गारवाडी,अकोले,अ.नगर

Comments