____एकच चूक___
का सोडून गेलीस मला
उत्तर मला मिळेल का
काय चूक झाली माझी
ते तरी मला कळेल का
आठवून बघ ते दिवस
तूच पुढाकार घेत होतीस
माझ्यासंग बोलण्यासाठी
रात्र रात्र जागत होतीस
मग काय झालं अचानक
बोलणं चालणं बंद झालं
इतक्या वर्षांचं प्रेम आपलं
एका दिवसात आटून गेलं
तुटून गेला संपर्क आपला
मोबाईल सुद्धा मुका झाला
कळले आसेल त्याला पण
प्रेमाचा आज शेवट झाला
झालं गेलं सोडू आता
मी ही तुझी रजा घेतो
तुझ्यामुळे मी कवी झालो
याचं श्रेय मी तुलाच देतो
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment