____हेच ते झाड___
आजूनही आठवतं मला
कशी आपली भेट झाली
आज तुला बघीतल्यावर
जुनी आठवण जागी झाली
हेच ते झाड आहे
इथे प्रेमाचा वास आहे
आजूनही हेच झाड
वाट आपली पहात आहे
त्यालाही सवय झाली होती
तुझ्या माझ्या सहवासाची
आपल्या प्रेम लीला पाहून
आपल्या सोबत डोलण्याची
आज ते झाड सुद्धा
नेहमीसारखं वाटत नव्हतं
पानं, फुलं गळाली होती
फक्त नावाला उभं होतं
विचारलं मी झाडाला
का असा उदास झाला
उत्तर त्याचं मिळालं मला
कोणीच येईना भेटायला
साउली मी देऊ कुणाला
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment