---तुझं माझं प्रेम---
जमली आपली जोडी
लागली प्रेमाची गोडी
चल फिरु एकांतात
घेऊ मजा थोडी थोडी
जाऊ आंब्याच्या राइत
बसू झाडाच्या खोडात
आज मिळाला एकांत
हात घेऊ या हातात
काळजाची धड धड
वाढू लागली जोरात
एक वेगळा आनंद
दाटू लागला मनात
तुझं माझं प्रेम आता
जास्त बहरू लागलं
थंडगार वाऱ्यासंग
मन डोलाया लागलं
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment