_____मन माझं____
भोळं भाबडं मन माझं
सखे तुझ्यावरच जडलं
सारी दुनिया सोडून ते
तुझ्याच प्रेमात पडलं
नाही कळलं मला पण
तुझ्यात काय दिसलं
मन मात्र तुला बघून
आतल्या आत हासलं
ध्यानी मनी नसताना
अचानक तू दिसली
मला न विचारताच
मनात जाऊन बसली
बाहेर पडायचं तर
नावच आता घेईना
दोन शब्द बोलल्याशिवाय
माझाही दिवस जाईना
रहा इथेच कायमची
बनून माझी महाराणी
दोघे मिळून लिहू आता
आपलीच प्रेमकहाणी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment