___माझा निसर्ग___
आमचं गाव डोंगरात
आम्ही रहातो रानात
रानातले प्राणी पक्षी
रोज खेळे अंगणात
सुर्यदेव नाही येत
लवकर डोंगरात
साऱ्या दुनियेच्या आधी
होते अंधारी ती रात
रानातली दाट झाडी
वाऱ्यासंग हो डोलती
पान,फुलं, झाडे,वेली
आनंदाने बहरती
येता वाऱ्याची झुळूक
स्पर्श जाणवतो नवा
देतो निसर्ग आमचा
शुद्ध मोकळी ती हवा
दाट झाडीमध्ये घर
तोच माझा राजवाडा
त्याची तटबंदी आहे
उंच डोंगराचा कडा
झोपडीचा राजवाडा
आनंदात मी रहातो
रोज उठता सकाळी
माझा निसर्ग पहातो
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अ.नगर
Comments
Post a Comment