____क्लासमेट____
लॉकडाऊनचा परिणाम
मलाही काही नव्हतं काम
मोबाईलच्या स्क्रीनवरच
बोटांना फक्त होतं काम
अचानक एक दिवस
मला एक मेसेज आला
समोरून मुलगी बोलली
ओळखलं का तू मला
मीही थोडा गोंधळलो
तसाच तिला बोललो
मी तर नाही ओळखलं
काय नातं आहे आपलं
नाराज होऊन बोलली
किती शोधलं मी तुला
कुठं गायब झाला होता
काहीही न सांगता मला
नंतर माझ्या लक्षात आलं
ती माझी क्लासमेट होती
शाळेत कधी बोलत नव्हती
आता बोलायला तरसत होती
मीही विचारलं तिला
तू कसं ओळखलं मला
थोडी नाराजीनेच बोलली
खरं वाटणार नाही तुला
काल तुझी कविता
वाचली मी एफ बी ला
तेव्हाच खात्री पटली मला
म्हणून तुला मेसेज केला
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment