___पहिली भेट___
त्या गोड संध्याकाळी
भेट आपली झाली
कधी नव्हती इतकी
आज का तू लाजली
ही तीच बाग आहे
इथेच भेट झाली
तुझ्या माझ्या प्रेमाची
सुरुवात इथेच झाली
पहिलीच भेट होती
तुही लाजली होती
हात हातात होता
पापणी झाकली होती
शब्द ओठात होता
बाहेर पडत नव्हता
शहारले होते आंग
शब्द फुटत नव्हता
शुद्ध नव्हती तुलाही
मीही शुद्धीत नव्हतो
हारपुन देहभान
निवांत बसलो होतो
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment