__उध्वस्त जीवन__
सोडना रे आता तरी
दारूचा हा नाद खुळा
जळून गेला तिच्यामुळे
संसाराचा सुंदर मळा
मुलाबाळांना घेऊन आज
बायको तुझी निघून गेली
एकाकी जीवन जगण्याची
वेळ आज तुझ्यावर आली
शरीराचीही वाट लागली
मरणाची वाट धरली आहे
दारूच्या एक एक थेंबाने
शरीर तुझं जळत आहे
नातेवाईक,सगे सोयरे
सर्वच आज दुरावले आहेत
अड्ड्यावरचे मित्र फक्त
पीण्यासाठी सोबत आहेत
मान,सन्मान,इज्जत कशी
हे तर तुला माहीतच नाही
दारूसाठी भीक मागतो
लाज जराही वाटत नाही
दारूच्या एका थेंबामुळे
जीवन तुझं उध्वस्त झालं
सर्व हातातून निघून गेलं
पण तुला ते नाही समजलं
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment