___समज मनाची__
समजावतोय खूप मी
रोज माझ्याच मनाला
चूक तर तूच केलीस
दोष तिला देतो कशाला
तूच तेव्हा घाबरलास
तिच्यासमोर बोलायला
मनातलं गुपित तेव्हा
तिच्यासमोर खोलायला
ती काही जोतिषी नव्हती
मनातलं तुझ्या जानायला
तूच धाडस करायचं होतं
तुझं प्रेम व्यक्त करायला
वेळ आता निघून गेली
लग्न ती करून गेली
तू बसला विचार करत
ती माझी का नाही झाली
सुखी आहे ती आता
तिच्या संसारात मग्न
नको आणू आता तिच्या
भरल्या संसारात विघ्न
दिसली जरी चुकून कुठे
जवळ तिच्या जाऊ नको
करत होता प्रेम तिच्यावर
कबुली याची देऊ नको
विसरून जा भूतकाळ तो
जो तिलाही माहीत नाही
यातच भलं आहे दोघांचंही
दुसरा कुठलाच मार्ग नाही
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment