_____वाट____
चेहरा तुझा दिसता
मन माझं हसायचं
तू जवळ आल्यावर
मन माझं नाचायचं
उभा आहे आजही
मी त्याच वाटेवरती
रोज ज्या वाटेने
तू येत जात होती
आज मात्र माझी
निराशाच झाली
निघून वेळ गेली
पण तू नाही आली
आज वाट चुकली
की वाट तू बदलली
मनाचीही माझ्या
का घालमेल झाली
उद्या पुन्हा येईल
येथेच उभा राहील
नाही तू आली तरी
तुझीच वाट पाहिल
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment