तुझं माझं प्रेम
तुझ्या प्रेमाच्या सावलीत
कायमचं बसावं म्हणतोय
एकदा डोळे बंद करून
तुला बघायचं म्हणतोय
आयुष्यभर तुझ्याबरोबर
वाटचाल करायची आहे
तुझ्याशिवाय ही वाटही
अंधारमय वाटत आहे
तुझ्या प्रेमाच्या उजेडातच
वाटचाल मी करू शकतो
तुझ्याच हाती जीवन माझे
इतकंच तुला सांगू शकतो
देशील ना साथ मला तू
आवघड या वळणावरती
आजही बसलो आहे मी
फक्त तुझ्या आशेवरती
विश्वास आहे मला खूप
तू मला समजून घेशील
आज नाहीतर उद्या तरी
होकार मला नक्की देशील
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment