आठवणीतलं प्रेम
विसरलो होतो मी तुला
आज पुन्हा दिसली कशाला
मनावरच्या जखमा माझ्या
आज पुन्हा ओल्या झाल्या
चालता चालता हात माझा
तूच तेव्हा सोडला होता
प्रेमाचा तो रंगलेला डाव
तूच तेव्हा मोडला होता
सावरत होतो मी एकटाच
साथ तुझी मिळत नव्हती
माझ्या खऱ्या प्रेमाची सीमा
तेव्हा तुला कळत नव्हती
आता वेळ निघून गेली
मार्ग दोघांचे वेगळे झाले
बंध प्रीतीचे जुळता जुळता
धागे प्रेमाचे तुटून गेले
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment