पहिल्या नजरेतलं प्रेम
त्या बाजूला तू होती
या बाजूला मी होतो
मधोमध रस्ता होता
मी तुलाच बघत होतो
खूप गेल्या त्या अप्सरा
आपल्या दोघांच्या मधून
नाही हाटली नजर माझी
तुझया सुंदर चेहऱ्यावरून
त्या आप्सरांच्या गर्दीतही
फक्त तूच मला दिसली
जेव्हा नजरानजर झाली
तू पण गालात हासली
खूप छान वाटलं मला
तुझं स्मित हास्य पाहून
बघत राहिलो तुझ्याकडे
पण बोलायचं गेलं राहून
वाटलं होतं दिसशील पुन्हा
एकदा तरी त्या ठिकाणी
पण नाही दिसली पुन्हा
ना ही दिसल्या आठवणी
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment