विनम्र अभिवादन

 🙏🏼विनम्र अभिवादन🙏🏼


कोणी म्हणे धरती आबा

कोणी म्हणे तुला भगवान

कोणीही असला तू तरीही

बिरसा तू होतास महान


महान होते तुझे विचार

लढलास तू आमच्यासाठी

नेहमीच राहील नाव तुझे

प्रत्येक आदिवासींच्या ओठी


करून मोठे उलगुलान तू

कढत राहिला इंग्रजांसी

म्हणून नेहमी सोबत होते

धाडसी वीर आदिवासी


आपल्या न्याय हक्कांसाठी

नेहमीच तू लढत राहिला

तुझ्या रूपाने लढाऊ योध्दा

इतिहासात आम्ही पाहिला


अन्याय अत्याचार आजही

बसलेत आमच्या छातीवर

जाती धर्माच्या भेदभावाने

हा समाज झालाय बेजार


आजही गरज आहे आम्हाला

बिरसा तुझ्या महान विचारांची

जमात वादात अडकून आम्ही

फसवणून करयोय स्वताचीच


योग्य मार्ग दाखवायला आम्हा

बिरसा येशील का पुन्हा तू

या साध्याभोळ्या समाजासाठी

जन्म घेशील का पुन्हा तू


      सिताराम कांबळे


आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना

      🙏🏼 विनम्र अभिवादन🙏🏼

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Comments