गैरसमज


गैरसमज


 आजही वाट बघतोय मी

नेहमीच्या त्या ठिकाणी

आजूनही वाटतं मला

येशील चोर पावलांनी


मन माझं सांगतंय

पुन्हा परतून येशील

पूर्वीसारखीच मला

पुन्हा जवळ घेशील


मनं थोडी दुरावली

पण नातं तसच आहे

आजूनही माझं मन

तुझंच गीत गात आहे


चूक तुझीही नव्हती

चूक माझीही नव्हती

गैरसमजाची दरी ती

दोघांमध्ये आली होती


गैरसमज झालाय दूर

मनात माजलंय काहूर

सांग सखे आजून असे

किती दिवस रहायचे दूर


     सिताराम कांबळे

     ८६५२७५९९२८

Comments