_शाळेच्या वाटेवर__
शाळेच्या त्या वाटेवर
रोज मला दिसायची
कधी पुढे चालायची
कधी मागे असायची
माझ्यापुढे चालतानी
मागे वळून बघायची
कधी गोड हसायची
कधी नजर मारायची
कधीतरी बोलायची
नजरेनेच खेळायची
अबोलाही धरायची
पुन्हा तीच बोलायची
खूप दिवस गेले असेच
जवळ येऊन म्हणाली
काय अशी जादू केली
मी तुझ्यात हरवून गेली
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment