जंगलाचा राजा

जंगलाचा राजा


 या डोंगर दऱ्यात,सह्याद्रीच्या या खोऱ्यात

जंगलाचा मी राजा ,मी रहातोय तोऱ्यात


रानातच मी खेळलो,रानातच मी वाढलो

रानातच या रानाच्या,रूपावर मी भाळलो


घनदाट जंगलात,दूर सागाच्या बनात

गायी वासरं चारतो रोज वाघाच्या रानात


रानात मी फिरतो, वाऱ्यासंग मी डोलतो

प्राणी आणि पक्षांसंग रोजच मी खेळतो


निसर्गच माय बाप,त्याचा मोठा हो आधार

त्याच्या कृपेनेच खातो,दोन वेळची भाकर


जरी कपडे फाटकी,रोज शेतात राबतो

काबाड कष्ट करून साऱ्या दुनियेला पोसतो


             सिताराम कांबळे

Comments