खट्याळ वारा

 __खट्याळ वारा__


जेंव्हा बघावं तेंव्हा

उभा असतो दारात

दरवाजा उघडताच 

घुसतो लगेच घरात


कधी करतो मस्करी

कधी खेटतो अंगाला

सांगते मी रोज याला

नको येऊ तू रंगाला


फिरतो हा गोलगोल

रोज माझ्या भोवती

समजत नाही याला

समजवावं तरी किती


खूपच खट्याळ वारा

माझ्यावर याची नजर

कधीही हा उडवतो

माझ्या साडीचा पदर


याचं हे आसं वागणं

मला आवडू लागलं

माझंही मन आता

त्याच्यात रमू लागलं


  सिताराम कांबळे

  ८६५२७५९९२८

Comments