____आरसा____
रोज वाट बघतो तुझी
उशीर तुला झाल्यावर
बेचैन होतो मी पण
तू नाही दिसल्यावर
लवकर तू उठते
मला जाऊन भेटते
माझ्याकडेच पाहून
तू रूप तुझं सजवते
कधी तू हसते मनाशीच
माझ्याकडे वळून बघून
पण मला वाटतं खुश होते
माझ्या मनात डोकावून
मी आहे तुझा आरसा
तू तर सुंदर रूपवती
रोज तुझं सौंदर्य पाहून
मन माझं आवरू किती
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment