___आमची माय___
तूच आई तूच माई
तूच होती सर्व काही
हजारो आनाथांची
झाली होती तू आई
तुझ्या कुशीत आम्ही
लहानाचे मोठे झालो
एका क्षणात आम्ही
पुन्हा पोरके झालो
तुझ्या मायेची सावली
होती आमच्या डोईवर
खेळत होतो रोज माई
आम्ही तुझ्या मांडीवर
तुझ्या पदराची सावली
आज अचानक ढळली
झालो आज अनाथ पुन्हा
माई आमची निघून गेली
जेष्ठ समाज सेविका
शिंधुताई सकपाळ यांना
भावपूर्ण श्रद्धांजली
💐🙏🏼💐
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment