पहिली भेट
चांदण्या रातीला
ती होती साथीला
चंद्र होता साक्षी
आमच्या भेटीला
पहिल्या भेटीचा
पहिला आनंद
पसरला होता
सर्वत्र सुगंध
भेट ती पहिली
चंद्राने पाहिली
तो थोडा हसला
ढगात लपला
ती पण लाजली
गालात हसली
कुशीत शिरून
लपून बसली
सांगितलं तिला
नको लाजू त्याला
आपला तो मित्र
कळतंय त्याला
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment